Posts

Showing posts from 2015

महानुभाव पंथाची माहिती (मराठी आणि हिंदी मध्ये)महानुभाव पंथ तथा जय कृष्णी पंथ स्थापना

महानुभाव पंथ मराठी मध्ये महानुभाव पंथ https://mr.wikipedia.org/s/ 2 gg मुकुंदराजांनंतर आणि ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर   महानुभाव   संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘ महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः ’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग , तो महानुभाव पंथ , असे म्हटले जाते.   वि.भि. कोलते   यांच्या मते (पहा  : लोकशिक्षण , वर्ष ७ , अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘ परमार्ग ’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम   एकनाथांनी   वापरले असल्याचे   शं. गो. तुळपुळे   म्हणतात. महानुभाव पंथाचे मूळ पुरुष   गोविंदप्रभू   ऊर्फ गुंडम राऊळ हे होते परंतु या पंथाचे प्रणेते मात्र   चक्रधर   आहेत. चक्रधरांचा कालखंड (इ. स. ११९४ ते १२८२) हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. देवगिरीच्या यादवांची कारकीर्द या वेळी महाराष्ट्रात होती. समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात चक्रधरांनी शंकराचार्य (अद्वैत) व रामानुजाचार्य (विशिष्टाद्वैत) यांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ करून (ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय कर